करमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

मतांसाठी हिरवी चादर

अफजलखान तुम्हचा पाहुणा होता का ?

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

वाघ नखं याविषयी बोलताना आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, हा सर्व प्रकार हास्यास्पद सुरू आहे. कोथळा काढणारी वाघ नखं भाजप आणत आहे. त्यामुळे पेंग्विन कुटुंबाच्या पोटात दुखत आहेत. त्यामुळे नकली वाघ आता पुरावे मागत आहेत. उबाठाची लोकं हे वारंवार छत्रपती आणि त्यांच्या परिवाराबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. छत्रपतींच्या शौर्यावर प्रश्न करत हास्यास्पद विधान करत आहेत. म्हणून हे सगळी नकली वाघ आहेत. कुठल्या मतांसाठी हे प्रश्न उपस्थित करत आहेत. पेग, पेंग्विन आणि पार्टी हे आदित्य ठाकरे यांचे विषय आहेत. पब मधल्या विषयांचा थयथयाट रस्त्यावर करायचा नसतो. अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर हे प्रश्न विचारत आहेत. आदित्य ठाकरे तुम्हाला कुठली मते मिळवायची आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मतासाठी लांगुनचालन चालू आहे.हिरवी चादर ओढून मत मागायची म्हणतात ते हेच आहे.

उबाठाची बदललेली भूमिका ही केवळ मतांसाठी

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा सन्मान होणार असेल तर त्यात चूक काय आहे. आम्ही मतासाठी कुठलीही गोष्ट करत नाही. वडेट्टीवार तुमचे सरकार मागील 50 वर्ष सत्तेत होते जे तुम्हाला जमले नाही ते आज महायुती सरकार करत आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारत आहेत असेही ते म्हणाले. प्रश्न विचारून कुठली मत मिळवू पाहत आहेत. जनता भोळी नाहीये. छत्रपतींच्या शौर्यबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या तुम्ही हिरवी चादर स्वतः बरोबर आदित्य ठाकरे यांना देखील हिरवी चादर दिली आहे का असाही सवाल त्यांनी केला. उबाठाची बदललेली भूमिका ही केवळ मतांसाठी आहे असेही ते म्हणाले

महायुती दक्षिण मुंबईतील जागा मोठ्या फरकाने जिंकणार

दक्षिण मुंबईतील लोकसभेच्या जागे विषयी बोलताना आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, अरविद सावंत यांचा पराभव ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मागच्या वेळी ते आमच्या मेहरबानीने जिंकले. त्यांचे कर्तृत्व नव्हते तरी नरेंद्र मोदींमुळे अरविंद सावंत जिंकले. अरविंद सावंत मोदींचे पोस्टर घेऊन फिरले म्हणून ते जिंकले. त्यांचा चेहरा कुणालाही दक्षिण मुंबईत माहित नव्हता. कर्तुत्वान नसलेल्या माणसाला जिंकवण्याची ताकद मोदींजींच्या नावात होती. आज
याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण करणारे आता कबरीवर फिरून मत मागत आहेत. दक्षिण मुंबई स्वाभिमानी मराठी माणसाची आहे याचा बदला घेईल. पूर्ण मुंबईतल्या 6 जागा आम्ही जिंकू त्याचबरोबर दक्षिण मुंबईची महत्वाची जागा मोठ्या फरकाने जिंकू असेही ते म्हणाले.

संजय राऊत बोलताना चिलीम आणि लिहिताना गांजा घेऊन बसतात

संजय राऊत यांच्याविषयी बोलताना आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, संजय राऊत बोलताना चिलीम आणि लिहिताना गांजा घेऊन बसतात. कुणीही बुद्धिमान व्यक्ती त्यावर उत्तर देणार नाही. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला द्यायचा हा निर्णय पालिका घेईल असेही ते म्हणाले.

काँग्रेस पदयात्रेविषयी बोलताना आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, राष्ट्रपिता गांधी यांना अभिवादन करायचं असेल तर इंडिया आघाडीच्या लोकांनी स्वच्छ भारत अभियानात सहभागी व्हायला पाहिजे होते. महात्मा गांधीजींच्या विचारांतील स्वच्छता आणि खादी महत्त्वाचा विषय होता. नकली इंडिया अलायन्सवाले लोक बाहेर पडले का? ते गांधी विचारांसाठी हे करतायत का? ते, ना स्वच्छता अभियान चालवत आहेत ना खादी खरेदी विक्री करत आहेत. त्यामुळे गांधीजींच्या नावावर राजकारण करणारे इंडिया अलायन्सवाले आणि गांधींच्या विचारावर चालणारे एनडीएवाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गांधींजींचे विचार पोहचवले जात आहेत. गांधींच्या नावावर राजकारण करू पाहणारे इंडिया अलायन्सवाले नकली लोक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button