कुख्यात ड्रग्ज तस्कर कैलास राजपूतच्या भावाला अटक
कुख्यात ड्रग्ज तस्कर कैलास राजपूतच्या भावाला अटक
श्रीश उपाध्याय/मुंबई
कुख्यात अंमली पदार्थ तस्कर कैलाश राजपूत याचा भाऊ कमल राजपूत याला मुंबई पोलिसांच्या खंडनी विरोधी पथकाने अंमली पदार्थांच्या व्यापाराच्या आरोपाखाली अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी, मुंबई पोलिसांच्या खंडनी विरोधी पथकाने अंधेरी पूर्व येथील श्री साईनाथ सोसायटीमधून 15.773 किलो ग्रॅम केटामाइन जप्त केले होते, ज्याची किंमत रू 7,87,15,000 रुपये आहे. या ड्रग्जसह पोलिसांनी विजय राणे, मोहम्मद आरिफ मोहम्मद इब्राहिम शेख, नितेश यादव, विकास गुप्ता, अभय जडये, बाबासाहेब काकडे आणि रितेश पवार यांना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीच्या आधारे अली असगर परवेझ आगा शिराझी याला २२ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासानंतर कुख्यात अमली पदार्थ तस्कर कैलास राजपूत आणि त्याचा भाऊ कमल राजपूत हे अमली पदार्थांच्या पुरवठ्यामागे असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कमल राजपूतला अटक केली आहे, तर कैलास राजपूत फरार आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त अमोघ गावकर यांच्या सूचनेनुसार खंडनी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गदोरे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.