महाराष्ट्रमुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

मुंबई-दि.20 सप्टेंबर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्राचा विकास घडू शकतो . या निर्धाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विद्यार्थी आणि युवक मोठ्या प्रमाणात जुळत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि विद्यार्थी संघटनेमधील महाराष्ट्रातील विविध पदांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख तसेच विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रक देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवक संघटनेतील पदाधिकाऱ्यांना विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रक देण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी अभयसिंग अरविंद कोंडे देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील युवकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्रक देण्यात आले ते पुढील प्रमाणे प्रदेश कार्यअध्यक्ष तथा नागपुर विभाग अध्यक्ष शैलेन्द्र गिरधारीलाल तिवारी, अभयसिंह अरविंद कोंडे देशमुख प्रदेश सरचिटणीस ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या भिवंडी शहर अध्यक्षपदी हरून जैस खान, बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी पराग विजय अवचार (पाटील), बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी ज़िया उल हक़,चंद्रपूर शहर अध्यक्ष कलाकार सतैय्या मल्लारप,कैलास तानाजी मोरे, खंबाळे तालुका त्रिंबक (प्रदेश संघटक), किरण भुसारे, (प्रदेश संघटक),जयराम शिंदे सिन्नर तालुका सिन्नर (प्रदेश सचिव),
पाथर्डी तालुका नाशिक ,मोहिबुल हक मकतेदार, अमरावती विभाग अध्यक्ष अनंतकुमार गंगारामजी काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष पदी सुनील गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर किरण शिखरे कोकण विभाग अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी संघटनेच्या राज्यातील विविध पदावर विद्यार्थ्यांची नियुक्ती पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. मनीष नाडकर यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रायगड जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, समीर सत्रे कल्याण डोंबिवली विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष, निखिल माने कल्याण विद्यार्थी शहराध्यक्ष, हाजी शेख कल्याण शहर कार्याध्यक्ष, प्रथम गोणते ऐरोली विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष, ओमकार कळंबे बेलापूर विधानसभा अध्यक्ष यांचे नियुक्ती करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button