मुंबई गुन्हे शाखेची 9 ची कारवाई
चार कोटींच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक
श्रीश उपाध्याय
मुंबई
मुंबई क्राईम ब्रँच 9 ने 4 कोटींच्या एमडीसह दोन आरोपींना अटक केली आहे.
अंधेरी पश्चिम येथील डी एन नगर भागात कोणीतरी ड्रग्ज विकणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा 9ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अर्शद अहमद शेख आणि इम्रान नूर मोहम्मद मेमन या दोन आरोपींना २ किलो ३३ ग्रॅम एमडीसह अटक केली. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत 4 कोटी 6 लाख 60 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी दिशान खान उर्फ दिशान बटाटा याचा शोध सुरू आहे.
पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त (प-१) अमोघ गावकर, सहायक पोलिस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई
गुन्हे शाखा ९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने केली आहे.