बिहारमधून फरार झालेल्या हत्येतील आरोपीला साकीनाका पोलिसांनी केली अटक
श्रीश उपाध्याय
मुंबई
बिहारमध्ये खून करून फरार झालेल्या एका आरोपीला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे.
बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील परसा बाजार पोलीस ठाण्यांतर्गत ८ महिन्यांपूर्वी प्रेम पासवान नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणातील फरार आरोपी नवीनकुमार रंजन हा गेल्या १० दिवसांपासून साकीनाका परिसरात लपून बसला होता. एका खबऱ्याने साकीनाका पोलिसांना नवीनची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नवीनला पकडले. चौकशीनंतर साकीनाका पोलिसांनी आरोपी नवीनला बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले.
सहपोलीस उपायुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलिस उपायुक्त (झोन-10) दत्ता नलावडे यांच्या सूचनेवरून साकीनाका पोलिसचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.