महाराष्ट्रमुंबई

मालाडच्या दिंडोशीत ‘मेरी माती, मेरा देश’ कार्यक्रम आयोजित

मालाडच्या दिंडोशीत 'मेरी माती, मेरा देश' कार्यक्रम आयोजित

मुंबई

देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अमर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि आवाहनावरून सुरू झालेल्या “मेरी माती मेरा देश” अभियानांतर्गत दिंडोशी विधानसभेत आमदार राजहंस सिंह यांचे मार्फत पवित्र कलशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या मातीतील शूर योद्ध्यांना आदरांजली वाहताना आमदार राजहंस सिंह म्हणाले, ज्या भूमीने देशभक्तांना जन्म दिला, ज्या भूमीसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व शूर शहीदांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.

या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष राजन सिंह, मुंबई सचिव ज्ञानमूर्ती शर्मा, जे.पी. सिंग, आनंद सिंग, पप्पू सिंग, कमलेश शुक्ला, लालासाहेब उबाळे, अयोध्या पाठक, सुधीर राऊत, अखिलेश पांडे, अजय यादव, मुन्ना सिंग, रामकुमार सोनी, राजकुमार पांडे, कांचन शर्मा आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button