गुन्हे शाखे 7 ने फरार आरोपीला अटक केली
गुन्हे शाखे 7 ने फरार आरोपीला अटक केली
श्रीश उपाध्याय/मुंबई
घाटकोपर परिसरात तीन वर्षांपूर्वी खून करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा 7 ने नवी मुंबईतून अटक केली आहे.
2020 मध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यात खुनाची घटना घडली होती. हत्येतील आरोपी मोहम्मद अली जफर शेख उर्फ बंगाली फरार झाला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचच्या म्हणण्यानुसार, बंगाली हा देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात पळत होता आणि सतत आपला मोबाईल बदलत होता. अखेर तो कल्याणला येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेने नाकाबंदी करून या बंगालीचा कल्याण येथून पाठलाग करून ऐरोली येथून अटक केली.
सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखे 7चे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश तावडे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.