खुनाच्या आरोपींना दोन तासात कारागृहात रवानगी
श्रीश उपाध्याय
मुंबई
हत्येची घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत मालवणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी केली.
जुन्या वैमनस्यातून ३० ऑगस्ट रोजी मालाडच्या मालवणी भागात काही लोकांनी इजाज शेखची हत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. घटनेनंतर दोन तासांत पोलिसांनी साबीर अन्सारी, अकबर अन्सारी, रेश्मा सय्यद आणि यास्मिन खान यांना अटक केली.
चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी (कायदा व सुव्यवस्था), अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन, पोलिस उपायुक्त (झोन-11) अजयकुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार मालवणी पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक चीमाजी आढाव यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.