डॉ राम मनोहर त्रिपाठी फाउंडेशन द्वारे आयोजित ‘कजरी महोत्सव’
डॉ राम मनोहर त्रिपाठी फाउंडेशन द्वारे आयोजित 'कजरी महोत्सव'
श्रीश उपाध्याय/मुंबई
डॉ.राम मनोहर त्रिपाठी फाऊंडेशनच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी साकीनाका येथे ‘कजरी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
डॉ राम मनोहर त्रिपाठी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी सांगितले की, सावन महिन्यात उत्तर भारतीय महिलांकडून कजरी लोकगीत गाण्याची प्रथा आहे. आम्ही उत्तर भारतीय समाजासाठी ‘कजरी महोत्सव’ आयोजित करत आहोत. या कार्यक्रमा दरम्यान कजरीचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना बांगड्या घालण्याची व पाय रंगवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका, ९० फूट रोडवर असलेल्या सेंट ज्युस स्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गायिका अलका झा कजरी लोकगीते लोकांसमोर सादर करणार आहेत.