Uncategorizedक्राईममुंबई

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

श्रीश उपाध्याय/मुंबई

13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला मुंबई गुन्हे शाखा 10 ने घटनेच्या 48 तासांच्या आत अटक केली आहे.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर एका रिक्षाचालकाने रिक्षातून प्रवास करणाऱ्या १३ वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. तक्रार मिळताच पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची जबाबदारी गुन्हे शाखा 10 वर सोपविण्यात आली. गुन्हे शाखेने सखोल संशोधन करून घाटकोपर येथून रिक्षाचा माग काढला आणि रिक्षाचालकाला अटक करून तपासासाठी पवई पोलिसांच्या ताब्यात दिले.
सहपोलीस आयुक्त(अपराध)लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन, सहायक पोलिस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा 10 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button