बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

सत्ताधारी पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे

शरद पवार हे जातीवादी पक्षासोबत जाणार नाही

नितीन गडकरी यांना अडकवण्याचं काम भाजपचा डाव

देशात आणि राज्यात सत्तारूढ पक्ष विरोधात वातावरण असल्याने निवडणुका टाळण्यात येतात

जो जिंकेल ती जागा त्या पक्षाला दिली जाईल

भाजपने फोडलेल्या पक्षातील आमदारांची भाजपच्या नजरेत लेखी शून्य

मुंब्रात कावड यात्रेत स्थानिक आणि बाहेरून आलेले लोकं किती याची सखोल चौकशी करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड

मुंबई-

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड आज बोलताना म्हणाले की देशात इंडियाला आणि राज्यात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. देशातील आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाची लोकप्रियता घसरत असल्याने निवडणुका घेण्यात येत नाही आहे. जर निवडणुका घेतल्यास मोठ्या प्रमाणात राज्यात महाविकास आघाडीला यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. जर निवडणूक घेतल्यास त्यात पराभव होण्याची शक्यता वाटत असल्याने निवडणुकीचा फटका बसला तर त्याचा परिणाम राज्याचा निवडणुकीवर होऊ शकतो म्हणून निवडणूका पूढे ढकलण्यात येत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

 

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील भाजपा पक्षातील नेत्यांकडून राज्यातील दोन पक्ष सोडण्यात आले आहे. त्याच पक्षातील आणि त्याच व्यक्तीच्या जवळचे समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन म्हणत आहेत की आता सगळ्याच पक्षांचे तीन तेरा वाजले आहेत त्यामुळे भाजपला मोकळं मैदान आहे. मला त्यांच्या सोबत गेलेल्या पक्षांबाबत हसायला आलं. ज्यांना त्यांनी पक्षात पक्ष फोडून घेतल त्यांचे तीन तेरा वाजले म्हणतात याचाच अर्थ त्यांची किमंत भाजप लेखी शून्य आहे. स्वतः पक्ष फोडले आणि स्वतचं त्यांना पक्षात घेतलं आणि आता तीन तेरा वाजले म्हणातात याचा इतर पक्षांनी विचार करावा की भाजपची नीती काय आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी आपली भूमिका भाजपसोबत न जाण्यासंदर्भात स्पष्ट करावे यावर राजू शेट्टीने केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आले त्यावेळी ते म्हणाले की, या आधी स्पष्ट केले आहे की आमचे विचार भाजप च्या विचाराच्या विरोधात आहे आमची लढाई वैचारिक आहे. शरद पवार साहेबांनी किती वेळ सांगायचं की मी जातीय वादी पक्षांसोबत जाणार नाही. असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की मला वाटतय नितीन गडकरी यांना अडकवण्याचा भाजपचा काहीतरी डाव आहे. कारण सगळे रिपोर्ट नितीन गडकरी यांच्या खात्याशी संबंधित असून त्यांच्यावर ताशेरे मारण्यात आले आहेत. अजून एका मराठी माणसाला अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये नितीन गडकरी यांची कामाच्या संदर्भात लोकप्रियता चांगली आहे या मराठी माणसाची लोकप्रियता वाढली असल्याने त्यांना अडचणीत आणण्याचे काम करण्यात येत आहे असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात कुठलेही मतभेद नाही आहे. लोकशाहीसाठी घातक असलेल्या भाजपला पराभूत करण्याकरिता आम्ही तिन्ही पक्ष राज्यात एकत्र आलो आहे तर देशात इंडिया एकत्रित आले आहे. राज्यात तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप बाबत असंच असणार आहे की ज्या जागा जे जिंकतील त्यांना दिलं जाईल. पर्यायी उमेदवार चांगला असेल तर त्याला नक्कीच संधी दिली जाईल. हा फॉर्मुला ठरलेला आहे. सोलापूर काँग्रेस साठी होती आणि माढा राष्ट्रवादी. त्यावेळी सगळे निर्णय होतील असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांच्या शहरात कावड यात्रा काढण्याची परवानगी कशी दिली हाच माझा प्रश्न आहे. स्थानीक किती माणसं होती बाहेरची किती होती याची चौकशी व्हायला हवं कारण 14 वर्षात मुंब्रात कावड यात्रेला परवागणी दिली नव्हती. काहीजण मस्जिद समोरं येऊन घोषणा देत होते. आज मुस्लिम 5 हजारच्या संख्येने रस्त्यावर बाहेर पडले. पोलीस दुर्लक्ष करत आहेत. असे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button