मुंबई क्राईम ब्रँच 9 ने दोन दरोडेखोरांना पिस्तुलासह अटक केली
श्रीश उपाध्याय
मुंबई
अंधेरी पश्चिम येथील डीएन नगर परिसरातून दरोड्याची योजना आखणाऱ्या दोन दरोडेखोरांना मुंबई गुन्हे शाखा 9 ने देशी बनावटीचे पिस्तूल आणि कट्ट्यासह अटक केली आहे.
डीएन नगर परिसरात काही लोक दरोडा टाकणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अरबाज खान, तबिश हुसेन या दोन आरोपींना रंगेहात अटक केली. दोन्ही आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, 3 रामपुरी चाकू, एक कट्टा आणि एकूण 23 जिवंत काडतुसे सापडली आहेत. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सहपोलीस आयुक्त(अपराध) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त शशीकुमार मीना, पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन, सहायक पोलिस आयुक्त महेश देसाई यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखे 9चे प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.