मनपा मधील व्यापक भ्रष्ट्राचारांमुळे मुंबईकर नागरी सुविधा पासून वंचित – नसीम खान
कुर्ला एल विभागवार नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली विराट जन आक्रोश मोर्चा
मुंबई
प्रतिनिधी : –
बृहन्मुंबई महानगर पालिका मधील व्यापक भ्रष्टाचारामुळे मुंबईत वर्षानुवर्ष राहत असलेल्या आणि मनपाचे सर्व प्रकारचे कर भरूनसुद्धा मुंबईकराना मूलभूत नागरी सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे. लोकांच्या नागरी समस्या आणि मनपाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आज माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखाली कुर्ला (प) येथील एल विभाग कार्यालयावर हजारों लोकासह विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मोर्च्यात शामील लोकांना संबोधित करताना नसीम खान म्हणाले की, चांदिवली, कालिना आणि कुर्ला विधानसभा मतदार संघात एल विभागाच्या हद्दीत विभिन्न ठिकाणी अनेक समस्यांचा ढिगार लागलेला असून एल विभागातील भ्रष्ट अधिकारी या सर्व समस्यांकडे लक्ष देत नाही आणि सध्या प्रशासक म्हणून काम बघणारे सहायक पालिका आयुक्त यांचा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा लगाम नाही. मागील दोन वर्षापासून नगरसेवक नसल्याने एल विभाग हद्दीत कुर्ला अंधेरी रस्ता रुंदीकरण, काजुपाडा पाईप लाईन रस्ता रुंदीकरणा सारखे प्रकल्प अद्याप पूर्ण झाले नाही. बिल्डर आणि मनपाच्या संगनमताने कसाईवाडा कुरेश नगर ते नेहरू नगर येथील रस्ता बंद करण्यात आला आहे. जागृती नगर ते कसाई वाडा कब्रस्तानकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे. भारत कोल कंपाऊंड कमानी कुर्ला येथील स्थानिक कामगाराना मनपाच्या संगनमताने बेरोजगार करण्याचे षड्यंत्र केले, फेरिवाल्यावर होत असलेल्या नियमबाह्य कार्यवाह्या, विविध विभागात पाणी टंचाई, रस्ते, गटारे, लादीकरण, कचरा, मनपा शाळामधील समस्या, मनपा दवाखाना व आपला दवाखाना मध्ये उद्भवलेल्या समस्या, मनपाच्या विविध उद्यानातील अपुऱ्या नागरी सुविधा, दत्तक वस्तीच्या माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार, रस्त्यावरील खड्डे, अशा आणि इतर अनेक मनपाशी संबंधित विभिन्न समस्याबाबत वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणत्याही तक्रारीचे अद्याप निवारण प्रशासक म्हणून सहायक पालिका आयुक्ताने केले नाही त्यामुळेच नागरी सुविधा पासून वंचित राहिलेल्या लोकाना एकत्र घेऊन थेट मनपा एल विभाग कार्यालयावर अधिकाऱ्याना जाब विचारण्याकरिता हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे नसीम खान यांनी सांगितले.
5 हजार पेक्षा जास्त असलेल्या जनसुमदायास नियंत्रन करताना स्थानिक पोलिस आणि वाहतूक पोलिसाना नाकी-नऊ आले असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
लोकाना संबोधित केल्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नसीम खान यांनी न झालेल्या कामाचा छिटाच त्यांच्या समोर मांडला आणि मनपाच्या विकास निधीमध्ये होत असलेला भ्रष्टाचार रोखण्याकरिता विकास निधी खर्च करत असताना दक्षता कमिटी नेमण्याची मागणी नसीम खान यांनी यावेळी केली. सहायक पालिका आयुक्तांनी नसीम खान आश्वस्त केले लवकरात लवकर सर्व कामाची आणि समस्याचे निवारण करण्यात येईल.
या मोर्चात जिल्हाध्यक्ष जगदीश अमिन, मुंबई महिला अध्यक्षा अनिशा बागूल, मुंबई सेवादल अध्यक्ष सतीश मनचंदा, महाराष्ट्रा कॉँग्रेस प्रवक्ते भरत सिंह, मुंबई कॉँग्रेस उपाध्यक्ष शरीफ खान, महासचिव प्रभाकर जावकर, जिल्हा कार्याध्यक्ष अरशद आजमी, सुभाष भालेराव, माजी नगरसेवक शरद पवार, अशरफ आजमी, सविता पवार, दिलशाद आजमी, मसुद अंसारी, महिला जिल्हाध्यक्ष प्रियतमा सावंत, उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष भरत सिंह, महिला तालुकाध्यक्षा माया खोत, प्रदेश प्रतिनिधी गणेश चव्हाण, मो गौस शेख, अनिल चौरसिया, वजीर मुल्ला आदि पदाधिकाऱ्यासोबत हजारोंच्या संखेने स्थानिक लोक उपस्थित होते.