बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

अनेक ज्येष्ठ शाखा ग्रंथपालांना बढतीविना निवृत्ती !

■ वर्षभर लांबवली पदोन्नती
■ मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यकारी मंडळाचा प्रताप

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या एकूण कारभाराची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले असतानाच तिथल्या गैरकारभाराचे नवे नवे नमुने बाहेर येऊ लागले आहेत. त्यात आधी बढतीसाठी निवड करूनही अनेक ज्येष्ठ शाखा ग्रंथपालांना बढतीविना निवृत्त करण्याचा प्रतापही कार्यकारी मंडळाने केला आहे.
एकीकडे येत्या ५ ऑगस्ट रोजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा साजरा करतानाच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ज्येष्ठ शाखा ग्रंथपालांवर अन्याय करत आहे.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे आजीव सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी त्याविरोधात थेट शरद पवार यांना लेखी पत्र ईमेल द्वारे पाठवून तक्रार केली आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यकारी मंडळाने मे 2022 मध्ये सहाय्यक ग्रंथपाल पदावर बढतीसाठी निवड करूनही वर्षभर विलंब लावून काही शाखा ग्रंथपालांवर बढतीविना निवृत्त होण्याची वेळ आणली आहे. विशेष म्हणजे, निवृत्ती जवळ आल्याचे कारण देतच त्या शाखा ग्रंथपालांना बढती मध्ये डावलण्यात आले आहे. त्यांना वगळून सुमारे 15 जणांना जून 2023 मध्ये सहाय्यक ग्रंथपाल पदावर बढती देण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी करून ज्येष्ठ शाखा ग्रंथपालांवर अन्याय करणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांवर करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात चाललेला सावळा गोंधळ, अनियमितता आणि नुकसानीबाबत तक्रारी केल्या होत्या. आपण त्यास सहमती दर्शवित दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. पण दुर्देवाने राजकारणी असलेल्या काही पदाधिका- यांनी याकडे कानाडोळा केला आणि सतत संस्थेने नुकसान केले आहे, अशी खंत गलगली यांनी व्यक्त केली आहे.

बदली बाबतीतही अशाच तक्रारी आहेत. कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र संहिता -नियमावली आहे. त्यानुसार नेमणूका बढत्या केल्या जात नाहीत. पदाधिकारी आपल्या मर्जीनुसार बढती नेमणूक करतात. मध्यवर्ती कार्यालयात काही कर्मचारी गेली 10 ते 12 वर्षे ठाण मारुन बसले आहेत. याबाबत चौकशी करत कारवाई करण्याची माफक अपेक्षा अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button