बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

‘त्या’ अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला काही नाही चालवत ?

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा खडा सवाल

मुंबई :-

काही दिवसांपूर्वी पुणे येथे डीआरडीओचा उच्च पदस्थ अधिकारी प्रदीप कुरुलकर याला एटीएसने अटक केली. मात्र त्याच्यावर ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत खटला सुरू आहे. मात्र हा खटला देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत का चालवला गेला नाही असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला

या अधिकाऱ्यावर हनीट्रॅपमध्ये अडकून एका पाकिस्तानी महिलेला देशाच्या गुप्त माहित्या इतर देशांना पुरवल्याचा आरोप आहे.

यावर सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की,  या अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला चालवायला हवा. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला का चालला नाही याची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना द्या अशी मागणीही त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button