विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या दाखल्याची वणवण आता थांबणार शाळा कॅालेज मध्येच मिळणार आवश्यक दाखले
विजय कुमार यादव
ठाणेः-
विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात लागणाऱ्या आवश्यक दाखले उदाहरणार्थ जातीचा दाखला,उत्पनाचा दाखला,नॅान क्रिमिलेयर,डोमिसाईल आणि इत्यादी दाखले आता शाळा आणि महाविद्यालयात उपल्बद्ध करुन देणार असल्याचे तहसिलदार युवराज बांगर सांगितले, १ ॲागस्ट ते ७ ॲागस्ट दरम्यान महसूल सप्ताह सुरु झाला असून बुधवार २ ॲागस्ट रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ठाणे येथे विद्यार्य्थासाठी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसिलदार युवराज बांगर व नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्य्थाना येणाऱ्या समस्या व त्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल अश्याप्रकारे विद्यर्थांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात लागणाऱ्या आवश्यक दाखले उदाहरणार्थ जातीचा दाखला,उत्पनाचा दाखला,नॅान क्रिमिलेयर,डोमिसाईल आणि इत्यादी दाखले आता महाविद्यालयात उपल्बद्ध करुन देणार असल्याचे सांगितले यावेळी महसूल सप्ताह या कार्यक्रमाअतर्गत विद्यार्थांना काही दाखल्याचे वाटप तहसिलदार युवराज बांगर व नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्या हस्ते करण्यात आले.