श्रीश उपाध्याय/मुंबई
कांदिवली येथे दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या एका आरोपीला पोलिसांनी देशी कट्टा आणि काडतुसासह अटक केली आहे.
कांदिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गीते यांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही व्यक्ती दरोड्याच्या उद्देशाने या भागात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून फरहान कुरेशी उर्फ सोनू या आरोपीला देशी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह अटक केली. तपासादरम्यान सोनूने दिल्लीतून दुचाकी आणि कार चोरून लुटण्याच्या उद्देशाने मुंबईत आल्याचे निष्पन्न झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन, पोलिस उपायुक्त (झोन-11) अजयकुमार बन्सल, सहायक पोलिस आयुक्त शैलेंद्र धिवर यांच्या सूचनेनुसार कांदिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.