बँकेचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करून फरार आरोपीला गुन्हे शाखेने केली अटक
श्रीश उपाध्याय
मुंबई
बँकेतून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखा 4 ने अटक केली आहे.
बँकेचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली वडाळा परिसरात सुमारे सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील दोन आरोपी गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होते. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखा 4 ने माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपी भालचंद्र पालव आणि रोहित नागवेकर या दोघांना नवी मुंबई येथून अटक केली आहे. तपासाअंती दोन्ही आरोपींविरुद्ध मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सहपोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त बलसिंग राजपूत यांच्या सूचनेनुसार मुंबई गुन्हे शाखा 4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.