साकीनाका पोलिसांची कारवाई
टकटक टोळीतील दोन आरोपींना अटक ! दीड लाखाचा माल जप्त
श्रीश उपाध्याय
मुंबई
साकीनाका पोलिसांनी टकटक टोळीतील दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा चोरीचा माल जप्त केला आहे.
राजाराम बलराम 31 yrs
शक्तिवेल मूरगन 21 yrs
तामिळनाडूतील चोरांची टोळी मुंबईत सक्रिय झाली होती. या टोळीतील चोरट्यांनी कार पार्किंगच्या आसपास नजर ठेवली होती. जेव्हा एखादा कार चालक गाडीत येऊन बसायचा तेव्हा गटातील लोक त्याच्या गाडीच्या बाहेर नोटा टाकायचे आणि कारच्या दाराच्या खिडकीकडे टकटक लावून गाडी चालकाला पडलेल्या पैशाबद्दल सांगायचा. पडलेले पैसे उचलण्यासाठी कारचालक गाडीचा दरवाजा उघडत असताना दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या टोळीतील इतर सदस्य कारमध्ये ठेवलेला लॅपटॉप आणि मोबाइल चोरून नेत होते.
अशीच एक घटना साकीनाका पोलीस ठाण्यांतर्गत ६ जुलै रोजी घडली. या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी तांत्रिक आणि माहिती देणाऱ्यांच्या मदतीने टकटक गटाच्या दोन चोरट्यांना ठाण्यातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांच्या चौकशीनंतर आणखी दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त भरतकुमार सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे, पोलीस निरीक्षक योगेश शिंदे व पथकाने ही कारवाई केली आहे.