ठाणे जिल्हा परिषदे तर्फे अनुकंपा तत्त्वावर १६ उमेदवारांची नियुक्ती
विजय कुमार यादव
जिल्हा परिषद ठाणे
दि. १३ जुलै २०२३
ठाणे जिल्हा परिषदेमार्फत शासन सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील एका पात्र उमेदवारास अनुकंपातत्वावर नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याच्या प्रक्रियेमध्ये फेब्रुवारी महिन्यात ठाणे जिल्हा परिषदेची अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षासुची प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर अनुकंपा भरतीबाबत शासन निर्णयातील मार्गदर्शकतत्वे व ठाणे जिल्हा परिषदेकडील प्रसिध्द करण्यात आलेल्या अनुकंपा प्रतिक्षासुचीमधील उमेदवारांच्या जेष्ठतेनुसार जिल्हा परिषदेमध्ये अनुकंपा भरतीसाठी उपलब्ध असलेल्या रिक्त पदांवर एकूण 16 उमेदवारांची निवडयादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
तसेच इतर उमेदवारांकडून निवड यादीबाबत आक्षेप/ हरकती मागविण्यात आल्या. याअनुषंगाने प्राप्त झालेल्या हरकतीचे निराकरण करून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली आहे.
जुन मध्ये जिल्हा परिषेदेतील विविध वर्ग ३ व वर्ग ४ संवर्गातील उपलब्ध रिक्त पदांवर अनुकंपा प्रतिक्षासुचितील १६ उमेदवारांना अनुकंपातत्वावर नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग श्री अविनाश फडतरे यांनी दिली.