राहुल गांधी यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा – आ. रोहित पवार
महाविकास आघाडी एकसंघ....मुख्य प्रवक्ते महेश तपासे
मुंबई
दि.12 जुलै
राज्यातील सामान्य लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जनतेसमोर अनेक समस्या उभ्या आहे. अनेक भागात शेतकरी पाऊस न पडल्याने त्रस्त झाला आहे. तर दुसरीकडे राज्यकर्ते खुर्चीकरिता एकमेकांसमोर उभे आहे. चांगल्या दर्जेदार खातं आपल्याला मिळावे याकरिता तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे दहा दिवस उलटून सुद्धा नवनिर्वाचित 9 मंत्र्यांना अद्यापही खातेवाटप करण्यात आला नाही अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या समर्थनात प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय मौन आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता आंदोलनात सहभागी झाले होते.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने शिवसेना ठाकरे यांच्या गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपयोग केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोबत आलेल्या नऊ मंत्री यांना मंत्री पदाची शपथ देण्यात आली होती त्यानंतर एक वर्ष होऊन सुद्धा अद्यापही त्यांच्यासोबत आलेल्या इतर आमदारांना मंत्री पद मिळाले नाही. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण असल्याने शिंदे गटांमध्ये आमदार नाराज आहे असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मधून फूट पाडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या नऊ मंत्र्यांना शपथ दिली त्या मंत्र्यांना अद्यापही खातेवाटप करण्यात आले नाही आहेत. भाजपच्या वतीने देण्यात आलेल्या अजित पवार यांच्या गटाला जे आश्वासन देण्यात आले होते ते पूर्ण होत नसल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. त्यांच्या पार्टी मधील लोकनेते ते टिकू देत नाहीत शिंदे साहेबांची ताकद कमी करायला भाजपाला एक वर्ष लागली आहे असे देखील रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून महाराष्ट्राचा इतिहास राहिला आहे की दिल्ली समोर केव्हाही महाराष्ट्राची सह्याद्री झुकलेली नाही आहे. सध्याचे केंद्रातील नेतृत्व हे महाराष्ट्राला दिल्ली समोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला शरद पवार साहेब यांनी विरोध केला आहे त्यामुळे मी शरद पवार साहेबांसोबत आहे महाराष्ट्र केव्हाही दिल्ली समोर झुकला नाही. आम्ही झुकू पण देणार नाही करण्यात येत नसल्याने आणि जर ते पूर्ण करण्यास असले तर त्याला शिंदे गटाकडून होत असलेल्या विरोधामुळे विलंब होत असल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटल आहे.