बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

प्रभाग ९ आय च्या सहाय्यक आयुक्त सौ हेमा मुंबरकर यांनी विध्नहर्ता सोसायटीतील अनधिकृत भिंतीवर अखेर केली तोडक कारवाई !

विजय कुमार यादव

कल्याण – प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या विध्नहर्ता सोसायटीच्या तळमजल्या वरील रूम नं ००४ समोर सोसायटीने अनधिकृतपणे बांधलेल्या भिंतीवर आज अखेर सहाय्यक आयुक्त सौ हेमा मुंबरकर यांनी निष्कासनाची धडक कारवाई करत बाधीत कुटुंबाला न्याय मिळवून दिला आहे .

श्रीमलंग रोडवरील अनमोल गार्डन जवळ असलेल्या विध्नहर्ता सोसायटीच्या तळमजल्यावरील वाहन तळावर अनधिकृतपणे बांधकाम केले आहे . या बांधकामामुळे वाहन पार्किंगला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे तळमजल्यावरच रहाणाऱ्या याच सोसायटीच्या एका सदस्याने या अनधिकृत बांधकामाची रितसर तक्रार प्रभाग ९ आय तसेच सहाय्यक आयुक्तांकडे केली होती . या तक्रारीच्या सुडबुद्धी पोटी सोसायटीने तक्रारदाराच्या दारातच अनधिकृत भिंत उभी करून तक्रारदाराच्या घरात जाणारी नैसर्गिक हवा आणि उजेड बंद केला होता .या भिंतीचीही तक्रार सदर तक्रारदाराने प्रभाग ९ आय तसेच अनधिकृत बांधकाम विभागाच्या उपायुक्तांकडे केली होती, तरीसुद्धा या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना मनात निर्माण होऊन तक्रारदाराने न्याय मिळावा म्हणून ही तक्रार आयुक्त महोदयांच्या लोकशाही दिनात दाखल केली होती . तसेच कल्याण पूर्वे २ जुलै २०२३ रोजी खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या जनता दरबारातही तक्रार अर्ज देण्यात आला होता एकूणच या सर्व तक्रारींची दखल घेण्यात येवून प्रभाग ९ आय च्या सहाय्यक आयुक्त सौ . हेमा मुंबरकर यांनी पालिकेच्या नगर रचना विभागाकडे पत्रव्यवहार करून ही भिंत बांधण्यास परवानगी दिली नसल्याची खातरजमा करून घेतली . त्या नंतर सदरची भिंत काढून घेण्याची नोटीस सोसायटीला ९ जुलै २०२३ रोजी देउन २४ तासांचे आत सदर भिंत तोडण्याची नोटीस बजावली होती .
परंतु ९ तारखेपासून आज रोजी ( ता . १२ ) पर्यंत सोसायटीने भिंत काढून घेतली नाही . परिणामस्वरूप सहाय्यक आयुक्त सौ . हेमा मुंबरकर यांनी आज पोलिस बंदोबस्तात ही अनधिकृत बांधण्यात आलेली अनधिकृत भिंतीवर हातोडा चालवत ही भिंत निष्कासित केली .
प्रत्येक आठवड्यात अनेक ठिकाणच्या अनधिकृत इमारती, चाळी यांच्यावर निष्कासनाची धडक कारवाई करणाऱ्या सहाय्यक आयुक्त सौ . हेमा मुंबरकर या एका मामुली अनधिकृत भिंतीवर कारवाई का करत नाहीत ? असा प्रश्न समाज माध्यमांवर सातत्याने उपस्थित होत असतांनाच आज सौ मुंबरकर यांनी पालिका आयुक्त डॉ . भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार तसेच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शना खाली सदरची वादातीत भिंत निष्कासित केली आहे .
दरम्यान तोडक कारवाई सुरु असतांनाच सोसायटीचे काही सदस्य आम्ही परत भिंत बांधून घेऊ असे बोलत असल्याचे ऐकताच सौ मुंबरकर यांनी संबंधीतांना सांगितले की तसा पुन्हा प्रयत्न जरी झाला तरी संबंधीतांवर फौजदारी गुन्हा दाखल होईल .
सौ . मुंबरकर यांच्या या धाडसी कृतीचे समाज माध्यमांवर कौतुक होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button