महिला बचत गटांनी दस्तऐवज व आर्थिक नोंदी ठेवा – मा. श्री. शितल कदम
विजय कुमार यादव
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत दिनांक ५ जुलै २०२३ रोजी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, शहापूर मधील स्वप्नपूर्ती मॉडेल CLF शेंदरून येथे उपसंचालक एमएसआरएलएम बेलापूर, महाराष्ट्र राज्य मा. श्रीम.शितल कदम, राज्य व्यवस्थापक, बेलापूर महाराष्ट्र राज्य मा. श्री. प्रभाकर गावडे यांनी भेट दिली. मॉडेल CLF चे सर्व प्रकारची अभिलेखे ग्रामसंघ तसेच NRETP अंतर्गत कार्यरत उद्योग सखी, M- CRP, BDSP,OSF समिती सदस्य SVEP CRP- EP यांच्यासोबत बैठक घेऊन झालेल्या कामाचा आढावा घेत व मार्गदर्शन करण्यात आले.
उमेद उद्योजक गटाला भेट दिली तसेच उद्योग विकास केंद्र अंतर्गत निधी दिलेल्या enterprises ला भेट देऊन व्यवसाय बाबत माहिती घेतली या वेळी स्वयं रोजगार विक्री केंद्राचे त्यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच PVTG लाभार्थी यांना अस्नोली येथे प्रत्येक्ष भेट देऊन संवाद साधला.
ग्रामसघांतील महिला योग्य पद्धतीने काम करत आहेत त्यांना वेळोवोळी मार्गदर्शन करने गरजेचे आहे. महिला बचत गटांनी दस्तऐवज व आर्थिक नोंदी ठेवणं गरजेच आहे त्यांचा फायदा त्यांना भविष्यात होऊ शकतो असे माहिती उपसंचालक एमएसआरएलएम बेलापूर, महाराष्ट्र राज्य मा. श्रीम.शितल कदम यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले.
त्याचप्रमाणे सोगाव येथे PMFME अंतर्गत सुरु असलेल्या मसाला उद्योगाला भेट दिली तसेच रायकरपाडा येथे मत्स्य जाळे तयार करणाऱ्या महिला सोबत संवाद साधला या वेळी जिल्हा समन्वय अधिकारी माविम ठाणे मा. श्रीम.अस्मिताजी मोहिते, जिल्हा अभियान व्यवस्थापक ठाणे मा.सारिका भोसले, जिल्हा व्यवस्थापक उपजीविका ठाणे मा.सुनील पाटील, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक शहापूर श्री. बाबासाहेब सावंत व मॉडेल CLF चे कर्मचारी उपस्थित होते.