नक्कल प्रतिसाठी NC किंवा FIR ची जाचक अट रद्द करण्याची मागणी
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुकडे मागणी
मुंबई विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तर्फे विविध प्रमाणपत्राची नक्कल प्रत मागणी करताना NC किंवा FIR ची जाचक अट रद्द करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांसकडे केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांस पाठविलेल्या पत्रात मागणी केली आहे की आज हजारों विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी विविध प्रमाणपत्राची नक्कल प्रतीची मागणी करतात. आज अशी प्रत घेण्यासाठी NC किंवा FIR करणे बंधनकारक आहे. ही जाचक अट असून ज्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस प्रत आवश्यक आहे त्याचे मुंबई विद्यापीठाच्या नमुना अर्जा सोबत आधार कार्ड आणि एक स्वयं लेखी पत्र दिल्यास प्रत दिली जाणे आवश्यक आहे. ही जाचक अट रद्द केल्यास विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस लाभ होईल आणि पोलीस ठाण्यात जाण्याच्या त्रासातून मुक्तता होईल, असे गलगली यांचे मत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत आज प्रत्येक वर्षी 4 ते 5 हजार अर्ज असतात. पोलीस NC किंवा FIR साठी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस पोलीस ठाण्यात जावे लागते यामुळे वेळ वाया जातो आणि प्रतिज्ञापत्र मागितल्यास त्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो.