चंद्रशेखर आझाद याच्यावर हल्ला करणाऱ्यावर त्वरित मोका लावा
नसीम खान
मुंबई
प्रतिनिधि :
काल उत्तर प्रदेश मधील सहारनपूर येथे एका कार्यक्रमाला जात असताना भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद याच्या कारवर अज्ञात लोकानी गोळीबार केला या हल्ल्यात चंद्रशेखर जखमी झाले. त्यांच्यावर केलेल्या हल्याचा महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष व माजी मंत्री मो आरिफ (नसीम) खान यांनी कठोर शब्दात निषेध केला असून हल्या करणाऱ्यावर मोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी नसीम खान यानी उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे.
नसीम खान पुढे म्हणाले की, यापूर्वीही चंद्रशेखर यांच्यावर अनेकवेळा जीवघेणा हल्ला झालेला आहे. दलित समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या चंद्रशेखर यांच्यावर झालेला हल्याच्या मागे कुठली जातीवादी शक्ती आहे याची सखोल चौकशी करण्याची तसेच उत्तर प्रदेश सहित संपूर्ण देशात विभिन्न ठिकाणी मॉब लिंचिंग व बहुजन समाजाच्या लोक हितासाठी झटणाऱ्यावर लोकांवर जीवघेणा हल्यासारख्या घटनेला आळा घालण्याची गरज असून राज्य व केंद्र सरकारने अशा घटनांची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करावी आणि त्वरित केंद्र सरकारने चंद्रशेखर आझाद यांना योग्य ती सुरक्षा प्रदान करावी अशी मागणीही नसीम खान यांनी केली आहे.