420 आहे रत्नाकर कुमार इम्पाचे उपाध्यक्ष!
420 आहे रत्नाकर कुमार इम्पाचे उपाध्यक्ष!
मुंबई
भारतीय मोशन पिक्चर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि वर्ल्ड वाइड रेकॉर्ड्स लिमिटेडचे संचालक रत्नाकर कुमार यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील सुजानगंज पोलिस ठाण्यात दुर्गा मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी हेराफेरी केल्या संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गा मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे मालक दुर्गेश सिंग यांनी सुजानगंज पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी भोजपुरी चित्रपटाचे हक्क ‘जो जीता वही सिकंदर’चे मालक दुर्गा प्रसाद मजुमदार यांच्याकडून विकत घेतले आहेत. नंतर, कराराचे उल्लंघन करून, मजुमदार आणि रत्नाकर कुमार यांच्या कंपनीने या चित्रपटाची डीव्हीडी आणि सीडी आणून विकली. कराराचा भंग करून दोन्ही आरोपींनी दुर्गेश सिंगसोबत खोटेपणा केला. दुर्गेशने याप्रकरणी जौनपूर न्यायालयात तक्रार केली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने तीन आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे आदेश सुजानगंज पोलीस ठाण्याला दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर, दुर्गा प्रसाद मजुमदार, रत्नाकर कुमार आणि डॉ. निवेदित कुमार यांच्याविरुद्ध सुजानगंज पोलीस ठाण्यात कलम 406,419,420 आणि 63 नुसार एफआयआर क्रमांक 0133/23 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.