रविवारी मुंबई भाजपाच्या वतीने ‘आणीबाणी’च्या निषेधार्थ विशेष कार्यक्रम
भाजपा महामंत्री संजय उपाध्याय यांची माहिती
मुंबई
दि: २४ जून २०२३
स्वातंत्र्यानंतरचा भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या समाज आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत ‘आणीबाणी’च्या निषेधार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
कार्यक्रम रविवारी (ता.२५) सायंकाळी ५ वा. वांद्रे (प.) येथील रंगशारदा सभागृहात होईल अशी माहिती भाजपा महामंत्री संजय उपाध्याय यांनी दिली. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रवीण दरेकर, आ. अतुल भातखळकर, आ. सुनील राणे, आ. अमित साटम, आ. योगेश सागर उपस्थित राहणार आहेत.
२५ जून १९७५ या दिवशी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्यानंतर देशभर दमनसत्र सुरू झाले. अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात काँग्रेसने सत्तेचा व बळाचा अमानुष वापर करून देशभर भयाचे व असुरक्षिततेचे वातावरण तयार केले हाेते. मानवाधिकारांचे व माध्यम स्वातंत्र्याचे हनन करणाऱ्या या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती भाजपा महामंत्री संजय उपाध्याय यांनी दिली.