ठाणे (प्रतिनिधी)-
ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या वतीने बकरी ईद आणि आषाढी एकादशीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. सामाजिक शांततेसाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता.
29 जून रोजी बकरी ईद आणि आषाढी एकादशी आहे. हिंदू-मुस्लीम धर्मियांचे सण एकाच दिवशी आले आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सामाजिक सलोखा कायम रहावा, या उद्देशाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांच्यासह दहा पोलीस अधिकारी, एक एसआरपी प्लाटून आणि पोलीस कर्मचारी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. ठाणे नगर पोलीस स्टेशन येथून निघालेला हा रूट मार्च अशोक सिनेमा, सिडको रोड, महागीरी, जांभळी नाका या मार्गाने पुन्हा पोलीस ठाणे येथे विसर्जित करण्यात आला. या रूट मार्चच्या आयोजनात पोलीस उपनिरीक्षक डी आर. जाधव, पोलीस हवालदार दिलीप माने यांनी महत्वाची भूमिका बजावली .