भाजप आमदार राजहंस सिंह यांनी मालाडमध्ये कार्यकर्त्यांसोबत योग दिन साजरा केला
मुंबई
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिंडोशी येथील श्याम बापू हॉल मालाड (पूर्व) येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार राजहंस सिंह यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्राणायाम व योगासने करून योग दिन साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 9 वर्षांपूर्वी योगाला संपूर्ण जगासमोर आणले, त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात मांडला, योगाचे महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्र संघाने (UNO)ही त्याला मान्यता दिली आणि 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
आमदार राजहंस सिंह यांनी उपस्थितांचे अभिनंदन करून योग शिबिरात योग करून सर्वांनी निरोगी राहण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार राजहंस सिंह, भाजपा मुंबई सचिव ज्ञानमूर्ती शर्मा, विभागीय अध्यक्ष राजन सिंह, माजी नगरसेवक संगीता शर्मा, जे.पी.सिंग, आनंद सिंह व प्रभाग अध्यक्ष दिंडोशी तालुक्याच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.