उत्तर मुंबईत ठिकठिकाणी विविध योग कार्यक्रमांनी योग दिन साजरा करण्यात आला
खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्वत: योगाभ्यास केला
मुंबई,
21 जून 2023:
जागतिक योग दिनानिमित्त आज उत्तर मुंबईत विविध ठिकाणी योग साधना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी यांनी आपापल्या भागात योग साधना कार्यक्रम आयोजित करून सहभाग घेतला.
पोयसर जिमखानातर्फे आयोजित योग साधना कार्यक्रमात खासदार गोपाळ शेट्टी यांनी सहभाग घेऊन योगासन केले. यावेळी योग शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
पोयसर जिमखाना आयोजित योग सोहळ्याला पतंजली योगपीठाच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली परिवार, आदित्य महाविद्यालय,
बंट समाज, अंबिका योग कुटीर, योग संस्कार समाधान केंद्र, हार्ट फुलनेस आदी सर्व मान्यवर संस्थांनी आज खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ९व्या जागतिक योग दिनाच्या योग साधना कार्यक्रमात सहभाग घेतला. बोरिवली पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणाच्या विशाल मैदानात हा भव्य योग ध्यान कार्यक्रम सादर करण्यात आला.
डॉ घनश्याम शर्मा यांनी योगासने करून घेतली. योग शिक्षक ज्योती मेहता, ज्योती पोपट यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, पोयसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी, पदाधिकारी करुणाकर शेट्टी, हर्षद मेहता, नगरसेविका प्रियांका मोरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
जागतिक योग दिनानिमित्त बोरिवली पश्चिमेच्या रस्त्यावरील योग साधना पुतळ्यांचे अनावरणही खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
निषाद कोरा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.