महाविकास आघाडीचे गठन पावर हंग्री जिहाद
- मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार
मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लव्ह जिहादमधून वाचला आहे असं वाटतं असताना महाविकास आघाडीची मांडणी होते. त्यामध्ये मला पावर हंग्री जिहाद दिसतो.? हा षडयंत्र आणि कटाचा भाग आहे. आजही औरंगजेबाच्या थडग्यावर जाणाऱ्यांबरोबर उद्धवजी मैत्री करतात. स्वा. सावरकरांचा धडा काढणाऱ्या काँग्रेसबरोबर जवळीक ठेवतात. चारी बाजूने पावर हंग्री जिहाद गंभीर वळणावर आहे त्याबद्दल सजग राहण्याचे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले.
ते वंदे मातरम संघ, दीनदयाळ प्रेरणा केंद्राच्या वतीने आयोजित ‘धर्मांतराचे वास्तव आणि समान नागरी कायदा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात आज बोलत होते. गडकरी रंगायतन येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी माधव नानिवडेकर, भावा दाते, ॲड. अंजली हेळेकर, विशाली शेटे, ओ. श्रुती, सुदिप्तो सेन, संदीप लेले, सचिन केदारी, राम आपटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
चार जिहाद प्रकार समजून घेतले पाहिजेत
आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, जे राष्ट्रभक्त आहेत ते सभागृहात उपस्थित आहेत. जो उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे; त्याला गोष्टी अतिशय स्पष्टपणे दिसत आहेत. हा प्रश्न केवळ धर्मांतराच्या वास्तवबद्दल सीमित नाही. हा प्रश्न हिंदू आणि राष्ट्र अस्तित्वाच्या संबंधापर्यंत पोहोचला आहे. जे सत्य समोर येते आहे त्याला खतपाणी घालण्यासाठी विरोधकांनी शेकडो वर्ष खर्ची घातली आहेत. यासाठी पोषक राजकीय व्यवस्था उभी केली गेली. मोदीजींच्या राज्यात या सगळ्याला भगदाड पाडण्याचे काम सुरू झाले आहे. सर्वसाधारणत: जिहादमध्ये चार गोष्टी आहेत. एक लव्ह जिहाद आहे. इलेक्ट्रॉनिक जिहाद सुरू आहे. सेवा देणारा जिहाद आणि पावर जिहाद आहे. धर्मांतरणाचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. धर्मांतर नाही तर मतमतांतर आहे. धर्म वैश्विक आहे. चांगलं वागलं पाहिजे, दुसऱ्याचे पोट भरलं पाहिजे, वरिष्ठांना, निसर्गाला नमस्कार केला पाहिजे अशी मूल्य सांगतो तो धर्म आहे. पत्नी पतीशी करते तो धर्म, पती पत्नीशी करतो तो धर्म, राजा जनतेशी करतो तो राजधर्म असतो. धर्म, मूल्य वैश्विक आहे. त्यामध्ये जाण्याची परंपरा आहे ही पंथ परंपरा आहे. संविधानामध्ये अगदी स्पष्ट लिहिलं आहे.. धर्मनिरपेक्ष नव्हे पंथ निरपेक्ष… सेक्युलॅरिझम म्हणजे पंथ निरपेक्ष.. गल्लत यात होत आहे. त्यामुळे अज्ञानाचा फायदा घेणारी टोळकी निर्माण होतात. जगण्याच्या मूल्यांपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात जुना मार्ग म्हणजे हिंदू पद्धती हिंदू धर्म आहे. गुगल चार हजार वर्ष सांगतो. लोकमान्य टिळक सांगतात ऋग्वेद त्याच्यापेक्षाही दहा हजार वर्ष आधी लिहिलं आहेत. ख्रिस्ती दोन हजार, इस्लाम दीड हजार वर्ष जुना.. या सगळ्यांमध्ये योग्य पद्धती आम्ही मांडली नाही कारण आम्ही सोशिक आहोत. आम्ही सर्वसमावेशक आहोत. आमचं मन मोठं आहे. घी शुद्ध असलं पाहिजे.
धर्मांतर विरोधी कायदा राबविला पाहिजे
आपल्याला समजून घ्यावं लागेल हिंदू धर्म प्राचीन आहेच. तो कधीच मी सर्वश्रेष्ठ आहे या लढाईत उतरला नाही. त्याने सर्वसमावेशकता ठेवली याचा अर्थ हिंदू धर्माची ती कायरता होती असं वाटायचं कारण नाही. गल्लत ती कायरता वाटायला लागली तिथूनच सुरुवात झाली. धर्म मतांतर चर्चेतून व्हायचं. दिल्लीची सल्तनतमध्ये मुंडकी छाटून धर्मांतर व्हायचं. कॉलिनियल काळात धर्म संस्था उभा करायला लागला. तिथून धर्मांतर व्हायला लागलं. मॉडर्न काळात चळवळीच्या रूपाने मत मतांतरन झालं. संविधानामध्ये प्रत्येकाला आपला धर्म जगण्याचा अधिकार आहे पण त्या कलमाचा अर्थ दुसऱ्याला त्रास होईल असा नाही. फ्रीडम ऑफ रिलेशन त्याच्यापुढे पण आहे. या सगळ्या गोष्टींना न समजता व्यवस्था उभी केली गेली. त्याचं पाप भोगण्याची वेळ दुर्दैवाने आपल्यावर आली आहे. काही राष्ट्रांनी त्याच्यावर मार्ग काढला आहे. अल्जेरिया देशाने धर्मांतरणाच्या विरोधात कडक कायदा केला. त्याच्यावर शिक्षा दिली आणि दंडाची सोय केली. इस्लामिक आक्रमण थोपवलं पाहिजे याची जाणीव त्यांना झाली. भूतानने तेच केलं. बुध्दीझम तिथे असताना ख्रिश्चन येत असल्याने कायदे केले. जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. भारतामध्येसुद्धा छत्तीसगड, गुजरात या सगळ्यांनी धर्मांतर विरोधी कायदा राबविला. याची पद्धत कायदा पारित करून केलेली आहे. लंडनच्या पोलीस कमिशनरने २००६ मधे जगाला ओरडुन सांगितले. तो भारताचा किंवा भाजपचा नाही. त्यानं सांगितले मतमतांतर माणसाच्या संबंधातील विषय राहिला नाही. तर राष्ट्राच्या राष्ट्रीयत्वाशी अस्मितेचा प्रश्न राहिला आहे. डोळे तरीही उघडले नाहीत. हे कितीही खरं असल..जो अल्पसंख्यांक असतो तो संघटित, सतर्क असतो. पण त्याची असुरक्षितता जेव्हा व्यापक स्वरूप घेते. तेव्हा प्रश्न गंभीर होतो. मतांसाठी तुष्टीकरण होते. मग त्यांचा अस्तित्वासाठी कट्टरपणा निर्माण होतो. त्यातून आतंकवाद सुरू होतो. त्याच्यातून अलगाव वादाची पायाभरणी होते. आणि सगळी सिस्टीम या भोवती फिरते. कुठेतरी याला तोडणे गरजेचे आहे असे आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.
लव्ह जिहादविषयी सजग होणं गरजेचं..
या लढ्यामध्ये जनतेचे बळ सामान्यांचा विश्वास आणि राजकीय पक्षांची कणखर भूमिका महत्त्वाची आहे. जे चार मार्ग दिसतात ते म्हणजे लव जिहाद, श्रद्धा वालकर केस अशीच होत नाही. एक रिपोर्ट अस सांगतो वर्षभरात देशातील दोन लाख माता भगिनी गायब झाल्या आहेत. ठाण्यामध्ये ५३५ भगिनी गायब झाल्या आहेत. याच्या तक्रारी आहेत. लव्ह जिहाद विषयी माहिती करून घेणं, सजग होण आणि दुसऱ्याला एकत्र घेणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक जिहाद दुर्दैवाने मुंब्र्यातून सुरू होतो. फोर्ट नाईट ऑनलाईन गेम करणारा शाहनवाज मक्सुद खान आहे. ४०० धर्मांतर केवळ ऑनलाईन गेमच्या माध्यमातून झाले आहेत असं रिपोर्ट आहे. लव्ह जिहाद एवढा इलेक्ट्रॉनिक जिहाद गंभीर आहे. त्याहून जास्त भयंकर सेवा जिहाद.. सेवा कार्याचे रूप दाखवून जिहाद मांडला जातो. त्याबद्दल आपल्याला सजग राहावं लागेल. थोडा विचार करा. स्विगीची डिलिव्हरी घेवुन येणारा एका विशिष्ट धर्माचा का असतो? घरामध्ये वस्तू रिपेअर करणारा विशिष्ट धर्माचा का असतो? जिमचा ट्रेनर विशिष्ट धर्माचा का असतो? ब्युटी पार्लरमध्ये सेवा देणाऱ्या मुली विशिष्ट धर्माच्या का असतात? जे जे जवळीक करणारे घटक आहेत त्यात विचारपूर्वक काही रुजवले जात आहे. सेवा इंडस्ट्रीमधील जिहाद तोच आहे. अन्य धर्माच्या बाबतीमध्ये आम्ही गरिबांची सेवा करतो, रस्त्यावरील एवढ्या लोकांना अंघोळ घालतो. त्या नावावर आमच्या घरामध्ये शिरू नये. आमची अडचण मानून त्या आधारावर मत मतांतर धर्मांतर केलं चालणार नाही. त्यामुळे सर्व्हिस जिहादकडे गांभीर्याने पहाव लागेल. या सगळ्या पद्धतीने जगातील देशातील हिंदूंची संख्या कमी व्हावी असा प्रयत्न होत आहेत. त्यासाठी जगातील जगोजागच्या व्यवस्था हातात घेतल्या जात आहेत. त्यामुळे पावर जिहाद लव्ह जिहाद पेक्षा घातक आहे. केरळमधील सरकार पक्षाच्या धोरणानुसार चालते की विविध प्रार्थना स्थळांमधून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींवर चालते असा प्रश्न आ. ॲड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
राजकीय पावर हंग्री जिहाद समजून घ्या
भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये जनतेचे जनमत मिळाल्यानंतर उद्धवजींना त्यांचा वाटा वाढवून देण्याची भूमिका झाल्यानंतरही काँग्रेस शेवटपर्यंत समर्थनाचे पत्र देईल की नाही असे चित्र निर्माण झाल्यानंतर कुणीतरी अहमद पटेल आणि कुठलतेरी चर्च ऍक्टिव्हेट होते. जी माहिती समोर येते. त्यात कुठला पीएफआय असो कुठल्यातरी चर्चमधून सोनियाजी यांच्यावर दबाव येतो उद्याच्या व्यवस्थेसाठी आता उद्धवजींना समर्थन द्या. अन्यथा काँग्रेसचे समर्थनाचे पत्र उद्धवजींना जाण्याचा मुद्दाच काय? २५ वर्षात मुंब्र्यात ना मालवणीत कधी बुलडोजर फिरत नाही. चारी बाजूने पावर पावर हंग्री जिहाद गंभीर वळणावर आहे. राम मंदिर निर्माण होते आहे. उज्जैन कॉरिडॉर होतो आहे. रस्ते होतायत. काशीला पंतप्रधान आरती करतायेत. या सगळ्याला विरोध करण्यासाठी विरोधक एकत्र येत आहे. या राजकीय पावर हंग्री जिहाद समजून घ्यायला पाहिजे. त्यासाठी मतमतांतर कायदा करणारच आहोत. या लव्ह, इलेक्ट्रॉनिक, सर्व्हिस जिहादबद्दल आपण सजग असले पाहिजे. पावर हंग्री लोकांना धडा शिकवण्यासाठी आपण सजग राहिले पाहिजे असे आवाहन आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले.