मुंबई, दि. 19 जून
उध्दव ठाकरे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देत आहेत,
अमेरिकेला काय जाता मणिपूरला जा… म्हणून मी तुम्हाला विचारतो मणिपूर सोडा तुम्ही आधी मुंबईच्या मालवणीतला गेलात होतात काय ? स्वतः घरातून बाहेर पडायचं नाही, पडला तर थेट विमानातून लंडनला जायचं… तिथून मुंबईकरांची चिंता करायची म्हणजे काय? तर काहीच करायचं नाही.. आणि मोदीजींना सल्ला द्यायला निघाले, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला.
भाजपा महिला मोर्चाच्या दादर येथे आयोजित सहकार संस्था प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी काल उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिले.
तुम्हाला मुंबईच्या मालवणीत ही जायला जमत नाही त्यामुळे तुम्ही मोदींना सल्ला देऊ नका, भाजपा
मणिपूर तर शांत करून दाखवेलच आणि मालवणीमध्ये वळवळ करणारी हिरवी चळवळ पण भारतीय जनता पार्टीच शांत करेल, उद्धवजी तुमच्या गटात तो दम नाही, असा जोरदार टोला त्यांनी लगावला.
उपस्थितीत महिला भगिनी ंना आवाहन करताना ते म्हणाले की,
सहकाराचे काम करताना एकमेकांच्या सहकारणी बना पण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून सांगतो विरोधकांनी विपर्यास प्रचार केला तर रणरागिनी पण बना. अशावेळी तुम्हाला रणरागिणी बनावेच लागेल कारण खोटं बोलणाऱ्यांच पीक वाढलंय आहे. काळं म्हटलं की सफेद का नाही असं विचारायचं, सफेद म्हटलं की पिवळ का नाही, असं विचारायचं.. तर पिवळा म्हटलं तर लाल का नाही? असं विचारायचं हे उद्योग सुरु आहेत. म्हणून आजूबाजूला विरोधकांचा जो खोटा प्रचार सुरु आहे त्याकडे ही लक्षद्यावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या नऊ वर्षात महिलांसाठी संवेदनशील कसे काम करते आहे याचा सविस्तर उहापोह त्यांनी आपल्या भाषणात केला.