महाजनसंपर्क अभियानातंर्गत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांचा नाशिक दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाने आयोजित केलेल्या महासंपर्क अभियानांतर्गत आज मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी नाशिकचा झंजावाती दौरा केला.
महासंपर्क अभियानातंर्गत
नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी सवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की,
भारतीय जनता पार्टीतर्फे ‘मोदी@9’ हे महाजनसंपर्क अभियान संपूर्ण देशभरात टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
सरकारने केलेली विविध कामे यांचा विमर्श आणि चर्चा, संवादात समाजातील काही प्रमुख बुद्धिजीवी व्यक्तींबरोबर करावा या विचारातून नाशिक येथे दौरा आयोजित केला आहे. हे अभियान आत्तापर्यंतचे सर्वांत मोठे अभियान असून प्रत्येक लोकसभा क्षेत्रातील अडीचशे प्रमुख व्यक्ती, विचारवंत यांचे संमेलन, मीडियाच्या प्रतिनिधींशी चर्चा, सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर्ससोबत बैठक, बूथ सशक्तीकरणासंदर्भात शक्तिकेंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा अशा विविध गोष्टी एकत्रितपणे या एका अभियानात एका महिन्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या नंतर आमदार अँड आशिष शेलार यांनी नाशिक मधील बुध्दीवंताशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार संवेदनशील, सामर्थ्यवान, सहभागीता आणि सुनियोजित काम कसे करते आहे याबाबत सविस्तर मांडणी केली. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सूचना ही त्यांनी ऐकून घेतल्या. तर संध्याकाळी नाशिक मध्य विधान सभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांसोबत संवाद आणि डबा पार्टी मध्ये सहभागी झाले.
या दौऱ्यात आमदार देवयानी फरांदे, सिमा हिरे, यांच्यासह नाशिकचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हा अध्यक्ष केदारनाना आहेर, राहुल ढिकले आदींसह पदाधिकारी उपस्थितीत होते.