पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांचे घराचे स्वप्न होणार साकार
मुंबई
जानू भोये नगर मालाड (पूर्व) येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांचे घराचे
स्वप्न साकार झाले आहे. या रहिवाशांना आता झो.पु.प्रा.योजनेद्वारे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर मिळणार आहे.जानू भोये नगरमधील रहिवाशांनी घरासाठी तब्बल १२ वर्षे लढा दिला. मालाड हायवे, मंत्रालय येथे धरणे आंदोलन केले अखेर रहिवाशांच्या लढ्याला यश मिळालं. आज दिनांक ११ जून २०२३ रोजी रहिवाशांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. जानू भोये नगरमध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना घर देण्यासाठी नगरसेवक आणि भाजप नेते विनोदजी मिश्रा यांनी अथक प्रयत्न केले.
महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने ६ सप्टेंबर २०१९ रोजी पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना घर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. तेव्हा मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस होते. पण काही कारणामुळे सरकार बदललं आणि नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. तसेच गृहनिर्माण खाते श्री फडणवीस यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी पुन्हा या विषयावार माहिती घेतली आणि म्हाडाच्या मुख्य कार्यालयात दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी बैठक आयोजीत केली. या बैठकित सविस्तर चर्चा आणि सादरीकरण देखील झाले होते.त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी क्षेत्रात असणाऱ्या जुन्या चाळातील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूंबाबत सहानभूतीपूर्वक तसेच सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते.
या बैठकिनंतर हा प्रस्ताव मंत्रालयातच पडून होता. त्यासंदर्भात माहिती घेवून नगरसेवक आणि भाजप नेते विनोदजी मिश्रा यांनी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. शनिवारी दिनांक १० जून रोजी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत नगरसेवक आणि भाजप नेते विनोदजी मिश्रा यांची भेट झाली आणि याविषयावर चर्चा केली. तसेच यासंदर्भात सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री फडणवीसजी यांनी दिले.
आज दिनांक ११ जून २०२३ रोजी जानू भोये नगर मालाड (पूर्व) येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना झो.पु.प्रा.योजनेद्वारे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर मिळणार असल्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाल्याचे कळविण्यात आले. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या त्वरीत निर्णयामुळे जानू भोये नगर येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे याचा आनंद तर आहेच, त्याचबरोबर या निर्णयाचा फायदा मुंबईमधील अनेक झोपडीधारकांना भविष्यात नक्कीच होणार आहे. राज्य सरकारने निर्णय घेताना दाखवलेली तत्परा उल्लेखनीय आहे याबद्दल मी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानतो असे मत नगरसेवक श्री विनोदजी मिश्रा यांनी व्यक्त केले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत माननीय खासदार श्री. गोपाळ शेट्टीजी आणि आमदार मिहीर कोटेचाजी यांनी मोलाची मदत केली याबद्दल त्यांचे ही आभार मानतो असेही नगरसेवक श्री विनोदजी मिश्रा म्हणाले.