उच्च शिक्षण विभाग व वसतिगृह प्रशासनाच्या ढिसाळ व्यवस्थेच्या बळी पडलेल्या पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यवापी आंदोलन पुकारणार – अभाविप
दिनांक 06 जून 2023
रोजी चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीची निघृण हत्या झाली ही पूर्णपणे वसतिगृह प्रशासन व उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई च्या ढिसाळ व्यवस्थेमुळे झाले आहे असे लक्षात येते. अभाविप चे हे ठाम मत आहे की सदरील घटनेचे वसतिगृह प्रशासन व उच्च व तंत्रशिक्षण विभाग ने पूर्ण जबाबदारी घेऊन प्रकरणातील सर्व दोषींवर तत्काळ कठोर कारवाई ची मागणी अभाविप करत आहे. त्याशिवाय वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेला लक्षात घेऊन आभविप आपल्या मागण्या घेऊन गेली दोन दिवस सलग सहसंचालक उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहे. विद्यार्थ्यांना उत्तरदायी असणारे हे कार्यालय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर न देता टाळाटाळ करत आपल्या ढिसाळ कारभारांच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याचा आव आणत मनमानी कारभार करत आहेत.
एकंदरीत आज पाहिलं तर महाराष्ट्रभरातील सर्व महिला वसतिगृहाची कारभार असेच असल्याचे लक्षात येते अभविप सर्व वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा विचार करून सदर घटनेतील सर्व दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई,सर्व वसतिगृहांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, सर्व वसतिगृहांमध्ये CCTV कॅमेरे लावण्यात यावे. यांसह आपल्या अन्य प्रमुख मागण्यांसह, तसेच सदर घटनेच्या बळी पडलेल्या पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी व झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी महाराष्ट्र व्यापी जन आंदोलन पुकारेल, अशी माहिती अभाविप मुंबई महानगर सहमंत्री जतिन शाह यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.