बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

पालिका शाळेत शिपाईची 1797 पदे रिक्त

मुंबई

मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत शिपाई, हमाल आणि माळी – रखवलदार यांची पदे मोठया प्रमाणावर रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस शिक्षणाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहिती उघडकीस आले आहे. पालिका शाळेत शिपाईची एकूण 1797 पदे रिक्त आहेत. तर 391 हमाल आणि 122 माळी नि रखवलदारांची पदे रिक्त आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत रिक्त पदांची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी यांनी अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत शिपाई, हमाल आणि माळी – रखवलदार या पदांची आकडेवारी उपलब्ध करुन दिली. यात शिपाईची एकूण मंजूर पदे 2635 असून रिक्त पदांची संख्या 1797 आहे. हमाल ही पदे 602 असून सद्या 391 पदे रिक्त आहेत तर माळी नि रखवलदारांची 122 पदे रिक्त असून मंजूर पदांची संख्या 231 आहे.

अनिल गलगली यांच्या मते प्रत्येक शाळेत शिपाई ही पदे महत्वाची असून आज मोठ्या प्रमाणावर ही पदे भरली गेली नाही. यामुळे शाळा स्तरावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी अडचणी येतात. यावर्षी शिक्षण विभागाने निधी वाढविली असून रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे. अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की महत्वाची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button