Uncategorizedबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

बोरीवली पश्चिम येथे 3 जून रोजी

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर

मुंबई,

बोरीवली पश्चिम येथील साईली इंटरनॅशनल स्कूल येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शनिवार, दि.3 जून रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीवली, जि.मुंबई उपगनर यांनी इयत्ता दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती तसेच याबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होण्याकरीता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर साईली इंटरनॅशनल स्कूल, एम.एच.बी. कॉलनी जवळ, गोराई रोड, बोरीवली (प.), मुंबई – 400091 येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत होईल.

या शिबिरास कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री श्री. लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सर्वश्री सुनील राणे, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, अतुल भातखळकर, योगेश सागर, अस्लम शेख आणि संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण दिगांबर दळवी, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई, किशोर खटावकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, मुंबई उपनगर प्रदीप दुर्गे,सहाय्यक आयुक्त, कौशल्य, रोजगार उद्योजकता नावीन्यता विभाग, मुंबई, रवींद्र सुरवसे, यांची प्रमुख उपस्थिती राहील.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून पहिल्या आलेल्या डॉ. कश्मिरा संख्ये यांचे स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन, प्रा.डॉ.दिनेश गुप्ता, लेखक अल्मेडा रॉबर्ट, समन्वय तज्ञ, राज्य कल मापन समिती यांचे मार्गदर्शन या शिबिरात लाभणार आहे. इ.10 वी व इ.12 वी उत्तीर्ण तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीवलीचे, प्राचार्य अनिल एम. सदाफुले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button