बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली आषाढी एकादशी

ठाणे (28)

पारंपारिक वेशभूषेत टाळ, मृदुंगाचा गजर करीत पालखी खांद्यावर घेवून जिद्द शाळेच्या मुलांनी आषाढीचे एकादशीनिमित्त शाळेत दिंडी काढली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी आज जिद्द शाळेत उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली.

हरिनामाचा गजर करीत शालेय विद्यार्थी दिंडीत उत्साहात सहभागी झाले होते. विठ्ठल रुक्म‍िणीची वेशभूषा करुन आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना साक्षात पंढरपूरचे दर्शन दिले. शाळा सुरू झाल्यानंतरचा आषाढी एकादशी हा पहिलाच उत्सव.. त्यामुळे‍ विद्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पसरले होते. टाळ, मृदुंगाचा गजर, हातात झेंडा व खांद्यावर विठ्ठलाची पालखी घेवून विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद लुटला असल्याचे जिद्द शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेट्ये यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button