अखेर रहिमतपूर सातारा मार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रीज वाहतुकीस सुरु
अखेर रहिमतपूर सातारा मार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रीज वाहतुकीस सुरु
रेल्वे फाटक जवळ होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्रात मोठया प्रमाणात रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम महारेल महामंडळ तर्फे सुरु करण्यात आले आहे. रहिमतपूर सातारा मार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रीज तयार असताना सुरु न झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी करताच अखेर शनिवारी वाहतुकीस सुरु करण्यात आला.
मागील 2 वर्षापासून महारेल महामंडळ तर्फे रहिमतपूर सातारा मार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम सुरु आहे. शुक्रवारी अनिल गलगली यांनी प्रत्यक्ष ब्रीजची पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की काम पूर्ण झाले असतानाही वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यांनी तत्काळ महारेलचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांस पत्र पाठवित वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती कळवली. मनोज सौनिक यांनी तत्काळ सदर ब्रीज वाहतुकीस सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले आणि 24 तासाच्या आत म्हणजे शनिवारी ब्रीज वाहतुकीची सुरु करण्यात आला. यामुळे येथील वाहतुकीच्या समस्येचे निराकरण होईल आणि अपघातावर नियंत्रण करता येईल.