बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

नाशिक क्वालिटी सिटी अभियानाच्या माध्यमातून दिशादर्शक काम व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई

क्वालिटी सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक शहरातील स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या बाबतीत होणारे काम इतरांना दिशादर्शक ठरेल. या प्रकल्पासाठी आपण टीम म्हणून काम करताना यासाठी आवश्यक ते सहकार्य शासनाकडून करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या अंमलबजावणी बाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे सेक्रेटरी जनरल डॉ. रवी सिंग, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट (एनएसडीसी)कॉर्पोरेशनचे पश्चिम विभागाचे प्रमुख मोहम्मद कलाम, एनएसडीसीचे संचालक जीतूभाई ठक्कर, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, नाशिक सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष आशिष कटारीया, ‘नाईस’ चे विक्रम सारडा, फोरमचे माजी अध्यक्ष हेमंत राठी, रामकृष्ण आरोग्य संस्थानचे संदीप कुयटे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, क्वालिटी सिटी अभियानाचा प्रयोग पहिल्यांदाच नाशिक येथे होत आहे. या अभियानासाठी नाशिक शहरातील विविध संस्था एकत्र येत आहेत यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. आपल्या शहरासाठी आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या भावनेतून आपण सर्व एकत्र आला आहात, त्यामुळे हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल. या अभियानाच्या अंमलबजावणीनंतर नाशिक शहरात सकारात्मक बदल दिसतील. त्यानुसार भविष्यात इतरही शहरांमध्येही हे अभियान राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button