महाविकास आघाडी तर्फे 17 डिसेंबरला निघणाऱ्या विराट मोर्चाची जय्यत तयारी
महाविकास आघाडी तर्फे 17 डिसेंबरला निघणाऱ्या विराट मोर्चाची जय्यत तयारी
येणाऱ्या 17 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता जिजामाता उद्यान (राणीचा बाग) भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस पर्यंत होत असलेल्या महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवाद तसेच राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचार शिंदे सरकारच्या विरूद्ध महाविकास आघाडी शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष व इतर घटक पक्ष यांच्यातर्फे संयुक्त मोर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे.
मोर्चाची पूर्व तयारी करण्यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते खासदार श्री अनिल देसाई, खासदार श्री विनायक राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान, माजी मंत्री श्री अनिल परब, श्री मिलिंद नार्वेकर, माजी महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, श्री मधु चव्हाण, श्री हेमंत टकले, आमदार रईस शेख यांच्यासह शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व इतर घटक दलाच्या नेत्यांनी पाहणी दौरा केला व आढावा घेतला.