खारघर दुर्घटनेतील मृतांना २५ लाख द्या – नसीम खान
विद्यमान न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्याची नसीम खान यांची मागणी
ठाणे :
खारघर दुर्घटनेत १३ नाही तर सुमारे ५० जणांना आपले प्राण गमवावे लागले असून जवळ-जवळ ५०० लोक जखमी झाले असल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री आरीफ (नसीम) खान यांनी केला आहे.त्यामुळे मृतांना २५ लाखांची मदत आणि त्यांच्या कुटुबियांतील सदस्याला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणही त्यांनी केलीआणि या प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत करण्यात यावी, ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते,त्यात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत ज्या कंपनीला सबकंत्राट देण्यात आले होते त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.
ठाण्यात कॉंग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण,प्रदेश सचिव मनोज शिंदे,ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे,प्रदेश सचिव अनिस कुरेशी,प्रदेश सदस्य राजेश जाधव,मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे राहुल पिंगळे महिला अध्यक्षा वैशाली भोसले उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना नसीम खान यानी सागितले की,वास्तविक पाहता हा सोहळा राजभवनमध्ये घेणे अपेक्षित होते.परंतु भर उन्हात हा सोहळा केवळ राजकीय फायद्यासाठी घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कोरोनाच्या नव्या व्हॅरीएन्टच्या केंद्राकडून गाईड लाईन देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ठाणे, नवी मुंबई आदींसह इतर ठिकाणी जमावबंदी लागू असतानाही हा कार्यक्रम घेण्यात आला. याशिवाय १४ कोटींचा खर्च करुन केवळ जे राजकीय पुढारी आले होते, त्यांच्यासाठी सर्व सुविधा होत्या. मात्र जे लोक दुरवरुन आले होते, त्यांच्यासाठी पाणी,जेवन,मंडप आदि आवश्यक अशा व्यवस्था ठेकेदाराने केली नव्हती.शिवाय ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते,त्याने सब कंत्राट दुस-याला का दिले? असा सवालही त्यांनी केला.ज्या कंपनीला हे काम दिले त्या लाईट अॅन्ड शेड या कंपनीचा ऐक भागीदार नरेश म्हस्के हे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला,या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करण्यात यावे व या प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षातेखाली चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी याप्रसंगी केली.
दुसरीकडे या घटनेत जे मृत झालेले आहेत,त्यांचे साधे सात्वन करायला देखील एकही नेता गेलेला नाही.या घटनेतील मृतांना प्रत्येकी २५ लाख,तसेच त्यांच्या कुटुबिंयातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी व उपचारार्थ दाखल असलेल्या लोकांना १० लाखांची मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.