बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

विश्वासघाताला भाजपात थारा नाही !

- प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे स्पष्ट मत

विश्वासघाताचं राजकारण उद्धव ठाकरेंकडून झाले असून भाजपात विश्वासघाती राजकारणाला अजिबात थारा नाही, असे थेट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ” त्यामुळे भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? यावर शंका वाटते.”

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे संघटनात्मक दौऱ्यात माध्यमांशी बोलत होते. श्री. बावनकुळे म्हणाले, जाहीर सभेत एखाद्या विषयाला घेऊन टिका केल्यास त्यावर हरकत नाही. आम्ही कुणावर व्यक्तीगत टिका करत नाही. जाणीवपूर्वक व्यक्तीगत टिका टिप्पणी योग्य नाही. शरद पवार व अजित पवार सरकारवर टीका करीत असतात, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र २०२४ मध्ये भाजपा आणि शिवसेनेचे काम बघून अनेकजण इकडे आमच्याकडे उड्या मारतील. उपमुख्यमत्री मा. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी अर्थसंकल्प वाचत होते, तेंव्हा विरोधकांचे चेहरे लहान झाले होते. यापुढचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प वाचताना विरोधक भाजपाकडेच येतील असा विश्वास मला आहे. “

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी दौऱ्यावर असून ते पदाधिकारी बैठक आणि बूथ बैठक, मोटारसायकल रॅलीसह सामाजिक बैठक व धन्यवाद मोदीजी या कार्यक्रमात सामील झाले.

• प्रभू रामचंद्रांच्‍या दर्शनाचा अधिकार सर्वांना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावरून सुरु असलेल्या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात श्री बावनकुळे म्हणाले, अयोध्येच्या दर्शनाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अनेकदा जातात. भव्य राममंदीर बनावे हे देशातील प्रत्येकाची इच्छा आहे. प्रभु रामचंद्र आराध्य दैवत असून त्यांच्या दर्शनाला जाण्याचा अधिकार सर्वांचा असून त्यावर टिका करू नये. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील दर्शनाला जाणार असे सांगितले. तेव्हा टिका केली का? असा सवाल केला

• विरोधकांनी सरकारपुढे प्रश्‍न मांडावे
निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही डिग्री असण्याचा कायदा नाही. वस्तुस्थीती न स्वीकारता केवळ टिका केली जाते. तुम्ही विकास झाला पाहिजे यासाठी टिका करा. राज्यात आणि देशातील प्रश्नाबाबत आंदोलन करा. अनेक विषय सरकारपुढे विरोधकांनी मांडावेत. मात्र महाराष्ट्र यापासून दूर जातो. जनतेच्या मनात नकारात्मक विचार पेरले जात आहेत. यातून आपण बाहेर निघायला पाहिजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राचे प्रश्न सरकारपुढे मांडायची गरज असून चुकीच्या गोष्टीवर बोलायला हरकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button