एमएमआरडीएचे तीन रॅम्प तयार पण वाहतुकीसाठी बंदी
मुख्यमंत्री यांस वेळच मिळत नाही
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबईत वेगाने काम होत असुन मागील काही दिवसांपासून एमएमआरडीएचे तीन रॅम्प तयार असतानाही वाहतुकीसाठी बंदी आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन करण्याच्या चांगल्या हेतुने एमएमआरडीएचे प्रयत्न आहे पण मुख्यमंत्र्यांस वेळ मिळत नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की मुंबईत 3 ठिकाणी उड्डाण पुलांचे रॅम्प तयार आहेत पण मुख्यमंत्री यांस वेळ मिळत नसल्याने मागील मागील 20 दिवसापासून सुरु केले जात नाही. यात घाटकोपर द्रुतमार्गावरील छेडा नगर, कुर्ला येथील सांताक्रूझ- चेंबूर जोडमार्गावरील सीएसटी आणि हंस भृगा मार्ग जोडणारे दोन्ही भाग याचा समावेश आहे. अनिल गलगली यांच्या मते आधीच प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही आणि उशीराने ज्या प्रकल्पाचे काम पूर्ण होते तेथे उद्घाटन करण्याच्या नादात अजून वेळ लागत आहे. मुख्यमंत्री यांस वेळ मिळत नसेल तर अन्य प्रकल्पासारखे यात प्रकल्पातील पूर्ण झालेले काम वाहतूकीसाठी सुरु करण्यात यावा, अशी विनंती अनिल गलगली यांची आहे