मुंबई गुन्हे शाखेने बलात्काराच्या फरार आरोपीला पाच वर्षांनंतर जेरबंद केले
श्रीश उपाध्याय
मुंबई
पाच वर्षांपासून फरार असलेल्या बलात्काराच्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.
विक्रोळी पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ४०७/१८ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी अनुपम दास हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी मुंबई क्राईम ब्रँच 7 कडे सोपवण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करून गुन्हे शाखेने आरोपी अनुपम याला कर्नाटकातून अटक करून विक्रोळी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिस आयुक्त विवेक फणसणकर, सह पोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चौहान, पोलिस उपायुक्त (प्र-१) कृष्णकांत उपाध्याय, सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव च्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक मुंबई क्राइम ब्रांच 7 चे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, महिला पोलीस निरीक्षक राजश्री बडगी, पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम, स्वप्नील काळे व पथकाने वरील कारवाई केली आहे.