नाशिकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

अन वीज गायब होताच मोबाईल बॅटरीच्या उजेडात जयंतराव पाटलांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

चांदवडमध्ये जयंतराव पाटलांच्या पक्षवाढीच्या मेहनतीला कार्यकर्त्यांनी दिली दाद

नाशिक

दि. २९ मार्च –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मंगळवारी आढावा बैठक सुरू असतानाच वीज गायब झाली मात्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांनी मोबाईल बॅटरीच्या उजेडावर पक्षबांधणीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

‘राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा’ या दौऱ्याचा मंगळवारी तिसरा दिवस होता. सकाळच्या सत्रात जळगाव केल्यानंतर नाशिक जिल्हयातील चांदवड विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या.

राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत असून या दौऱ्यात पक्षवाढ आणि बुथ कमिट्या स्थापन करण्याचे आवाहन जयंतराव पाटील करत आहेत.

मंगळवारी रात्री अकरा वाजता चांदवड विधानसभा मतदारसंघाची बैठक सुरू असतानाच अचानक वीज गायब झाली मात्र वीज येईल याची वाट न बघताच जयंतराव पाटील यांनी मोबाईल बॅटरीच्या उजेडात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जयंतराव पाटील यांनी मोबाईल बॅटरी सुरू करताच संपूर्ण सभागृहात मोबाईल बॅटरीचा उजेड करुन पक्षाप्रती व जयंतराव पाटील यांच्या पक्ष वाढीच्या मेहनतीला कार्यकर्त्यांनी दाद दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button