राहुल गांधींची खासदारकी रद्द करून मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला – नसीम खान
मुंबई,
काँग्रेसचे नेते मा. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून केंद्रातील मोदी सरकारने देशात लोकशाही नाही हे दाखवून दिले आहे. एका खोट्या प्रकरणाचा आधार घेऊन राहुल गांधी यांच्यावर २४ तासाच्या आत कारवाई करण्याची मोदी सरकारला घाई का झाली होती? हा निर्णय घेऊन मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी टीका माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे. मोदी सरकारच्या विरुद्ध कॉँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण राज्यात धरना प्रदर्शन सुरू असून आज उत्तर मध्य मुंबई जिल्हा कॉँग्रेस तर्फे सकाळी 10 ते संध्या 5 वाजेपर्यंत आयोजित धरना प्रदर्शनात नसीम खान बोलत होते. या प्रदर्शनास स्थानिक लोकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व धरना प्रदर्शनात सामील झाले.
या प्रदर्शनात उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष जगदीश अमीन, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते भरत सिंह, नगरसेविका विनी डिसोजा, बाळा सर्वोदये, राजेश टेके, रफीक शेख, विलिसिया डिसोजा, प्रेम सिंह, हसण हवेली, अंजु कराले, कामालुद्दीन असारी यांच्यासह हाजोरोंच्या संखेने स्थानिक लोक उपस्थित होते.