कुर्ल्यात भगवान झुलेलाल जन्मोत्सव साजरा करण्यात आला. भजन कीर्तन आणि भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कुर्ला पश्चिम येथील झुलेलाल मंदिरात जन्मोत्सव, चेटी चांद आणि सिंधी नव वर्ष आयोजित करण्यात आले होते. मागील 70 वर्षापासून कुर्ल्यात जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, उद्योगपती मनोज नाथानी, कुर्ल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र होवाळे, चेतन कोरगांवकर उपस्थित होते. तसेच मोहनदास प्रेमानी, अर्जनदास प्रेमानी, शंकरलाल हसेजा, किशोर वलेचा, अनिल भाटीजा, कीर्ती देवजानी, विनोद फटनानी, दिलीप मोटवानी, लालचंद नागरानी, संजय केसवानी, उमेश प्रेमानी उपस्थित होते.