महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘भागवत धर्मा’ला समर्पित अर्थसंकल्प – आचार्य तुषार भोसले
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भागवत धर्माला समर्पित आणि साधुसंतांना अपेक्षित असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आज मांडला !
आज तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर तुकोबारायांच्या वेगवेगळ्या अभंगाची जोड देत आणि माऊली ज्ञानोबारायांच्या संकल्पप्रमाणे ‘जो जे वांछील तो ते लाहो ।’ असं समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा आजचा हा अर्थसंकल्प आहे. साधू संतांचा आणि देव धर्माचा संपूर्णपणे सन्मान या अर्थसंकल्पात केला गेला. धार्मिक क्षेत्रासाठी एक भरीव तरतूद करण्यात आली आणि विशेष म्हणजे आमच्या भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन गावोगाव ज्ञानप्रबोधन करणाऱ्या आमच्या कीर्तनकार-प्रवचनकारांसाठी ‘श्रीसंत नामदेव महाराज किर्तनकार सन्मान योजना’ म्हणजे या अर्थसंकल्पातली वारकरी संप्रदायासाठी आणि आध्यात्मिक क्षेत्रासाठी ची ऐतिहासिक घोषणा आहे !
मी माननीय देवेंद्रजींचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हिंदुत्ववादी शिंदे-फडणवीस सरकारचे या अतिशय लोक कल्याणकारी अर्थसंकल्पाबद्दल आभार मानतो.