क्राईमबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

सोनसाखळी चोरीतील फरार आरोपीला चालत्या ट्रेनमधून अटक

मुंबई

दहिसर गोल्ड कंपनीतून खरगपूर आणि पश्चिम बंगालमधून सोने चोरून पळून गेलेल्या दोन आरोपींना MHB पोलिसांनी अटक केली आहे.

MHB पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले की, 28 फेब्रुवारी रोजी दहिसर येथील वैशाली इंडस्ट्रीमध्ये असलेल्या सोन्याच्या कंपनीत सोने चोरी झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात आली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. यातील एक आरोपी आरिफ शेख अहमदाबाद येथे असल्याची माहिती मोबाईलवरून मिळाली होती.

तपासासाठी पोलिसांचे पथक तातडीने अहमदाबादला गेले असता, आरोपी आरिफ ट्रेन पकडल्यानंतर हावड्याला निघाल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने मुंबईत येऊन विमानाने कलकत्ता गाठले. खडकपूर रेल्वे स्थानकाजवळ चालत्या रेल्वेची तपासणी करताना पोलिसांनी आरिफला अटक केली. आरिफची चौकशी केल्यानंतर दुसरा आरोपी सलमान शेख यालाही पश्चिम बंगालमधील हावडा येथून अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून चोरलेल्या 90 ग्रॅमपैकी 40 ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button